Plastic Surgery Day

15 जुलै  हा राष्ट्रीय प्लास्टिक सर्जरी दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त प्लास्टिक सर्जरीबाबतची माहिती घेताना, त्याविषयीचे गैरसमज दूर होणेही गरजेचे आहे.

वैद्यकशास्त्रातील आधुनिक उपचार पद्धतीमुळे आज मानवाचे जीवन सुखकर झाले. अनेक आजारांपासून त्याला मुक्ती मिळाली आहे. नव्या, आधुनिक तंत्रज्ञानाने दुर्धर आजारांवरही उपचार करणे सोपे झाले आहे. प्लास्टिक सर्जरी ही अशीच एक आधुनिक उपचार पद्धती आहे. 15 जुलै ,हा राष्ट्रीय प्लास्टिक सर्जरी दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त प्लास्टिक सर्जरीबाबतची माहिती घेताना, त्याविषयीचे गैरसमज दूर होणेही गरजेचे आहे.

प्लास्टिक सर्जरी फक्त सुंदर दिसण्यासाठी आहे का? प्लास्टिक सर्जरी फक्त श्रीमंतांसाठी आहे का? प्लास्टिक सर्जरीमध्ये प्लास्टिक वापरले जाते का? प्लास्टिक सर्जरी फक्त त्वचा रोग असणाऱ्या रुग्णांसाठी असते का? असे एक ना अनेक प्रश्न सर्वसामान्यांना पडतात. प्लास्टिक सर्जरीबाबत अनेक समज गैरसमज आहे. आजकाल तर सोशल मीडियावर कोण काय माहिती टाकेल आणि काय गैरसमज पसरतील, याचा नेम नाही. व्हाट्सएप विद्यापीठातील तज्ज्ञ तर प्रत्येक विषयावर स्वतःचे मत मांडत असतात, त्यातूनही अनेक गैरसमज पसरतात.

प्लास्टिक सर्जरीमधील प्लास्टिक हा शब्द ग्रीक या भाषेतून आला आहे. प्लास्टिकोज या मूळ शब्दापासून त्याची उत्पत्ती झाली आहे. प्लास्टिकोज म्हणजे पुनर्मुद्रण (रिमॉडेलिंग). प्लास्टिक सर्जरी म्हणजे उती पुनर्मुद्रण कला (टिश्यू रिमॉडेलिंग). सुश्रुतला “प्लॅस्टिक सर्जरीचे जनक” मानले जाते. ते इ.स.पू. 1000 आणि 800 दरम्यान कधीकाळी भारतात राहिले आणि प्राचीन भारतात औषधांच्या प्रगतीसाठी ते जबाबदार आहेत. त्यांनी शरीरशास्त्र, पॅथोफिजियोलॉजी आणि उपचारात्मक रणनीती यांचे शिक्षण अतुलनीय तेजस्वीपणाचे होते, विशेषकरून ऐतिहासिक काळातील त्याच्या वेळेचा विचार केला. ते अनुनासिक पुनर्रचनासाठी(Nasal Reconstruction) प्रख्यात आहेत, जे हिंदू औषधांच्या वैदिक कालखंडातील त्याच्या चित्रणातून संपूर्ण साहित्यात सापडतात.

आधुनिक प्लास्टिक सर्जरीचा जनक म्हणून ओळखल्या जाणार्‍या डॉ. हॅरोल्ड गिलिस यांनी दुसर्या महायुद्धात जगातील प्रथम यशस्वी त्वचेच्या कलम विकसित केले(Skin Graft). डॉ. गिलिस यांनी गंभीर जखमी आणि अपंग सैनिकांचे उपचार करण्यासाठी लवकर प्लास्टिक सर्जरीचे तंत्र विकसित केले ज्यामुळे ते सामान्य नागरिक म्हणून संपूर्ण जीवन जगू शकले.प्लास्टिक सर्जरी ही कुठल्याही एका अवयवाशी निगडीत नाही. प्लास्टिक सर्जरी ही नखांपासून ते केसापर्यंत कोणत्याही बाह्य अवयवावर वापरता येते. केसरोपण (हेअर ट्रान्सप्लांट), लायपोसक्शन व टमी टक, स्तनांच्या सौंदर्य शस्त्रक्रिया, नाक सुंदर बनविणे (रायनोप्लास्टी) या प्रकारच्या अॅस्थेटिक सर्जरी हा प्लास्टिक सर्जरीचा एक भाग आहे. याव्यतिरिक्त प्लास्टिक सर्जरी ही बऱ्याच आजारांना उपयुक्त असते, जसे की चेहऱ्यावरच्या जखमा, हातावरील जखमा, मधुमेहामुळे पायावर झालेल्या जखमा (डायबेटिक फूट), जन्मतः असलेले व्यंग, चिवट जखमा, भाजलेल्या जखमांवर उपचार, विकृती सुधारणा, ट्रॉमा री-कनस्ट्रक्शन,कर्करोग री-कनस्ट्रक्शन
प्लास्टिक सर्जरीने उपचार करता येतात.

प्लास्टिक सर्जरी ही सर्वसामान्य माणसांना सुद्धा परवडणारी आहे. शस्त्रक्रियेतील वैद्यकीय पदव्युत्तर(M.S/DNB)अभ्यासक्रमानंतर एमसीएच(MCh Plastic Surgery)किंवा डीएनबी(DNB Plastic Surgery)ही पदवी असलेले डॉक्टर प्लास्टिक सर्जरी करण्यासाठी पात्र असतात.

डॉ. प्रितीश श्रीकांत भावसार, प्लास्टिक सर्जन (एमसीएच(MCh), प्लास्टिक सर्जरी) लक्ष्मी हॉस्पिटल, डोंबिवली (पूर्व).

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *